जिल्ह्यात मतदार यादी मॅपिंग कामास प्रारंभ

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : जिल्ह्यात मतदारसंघनिहाय मतदार यादीचे मॅपिंगचे काम सुरू झाले आहे. मतदार याद्यांच्या स्पेशन इन्टेन्सिव्ह रिव्हीजन (एसआयआर) चे काम या महिनाअखेर सुरू होणे शक्य आहे. त्या पार्श्वभूमीवर २००२ साली ज्यांचे नाव मतदान यादीत असेल, त्या यादीशी सध्याची मतदार यादी जुळविण्याचे म्हणजेच मॅपिंगचे काम निवडणुक विभागाने हाती घेतले आहे. 
२००२ साली ज्यांचे नाव नव्हते, त्यांच्या नातेवाईक जसे, आई-वडील यांचे नाव असेल तर त्याच्याशी जुळविण्यात येत आहे. विवाहित मुलींचे नाव त्यांच्या पुर्वीच्या ठिकाणी जुळवून पाहिले जात आहे. सध्या मॅपिंग करून ठेवण्याच्या सुचना निवडणुक आयोगाने दिल्या आहेत. एसआयआरचे काम अद्याप सुरू झालेले नाही. एसआयआरचा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर बीएलओ प्रत्येक कुटूंबाच्या घरी येऊन इम्युनिशन फॉर्म देऊन तो भरून घेतील. त्यानुसार मतदारांची सत्यता पडताळणी होईल.